Lekha koshagar Amravati Bharti 2025 | अमरावती लेखा कोषागार भरती 2025

By mnnokri

Published on:

Lekha koshagar Amravati Bharti 2025

Lekha koshagar Amravati Bharti 2025: लेखा व कोषागार विभाग अंतर्गत विविध गट (क) अमरावती या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, अमरावती, कोषागार कार्यालय, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ व बुलडाणा कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल (गट-क) या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लेखा व कोषागार विभाग अंतर्गत कनिष्ठ लेखापाल गट (क) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 45 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे. या भरतीसंदर्भात तपशीलवार माहिती खाली दिली आहे.

Lekha koshagar Amravati Bharti 2025: सविस्तर माहिती

विभागाचे नावलेखा व कोषागार विभाग, अमरावती
पदाचे नावकनिष्ठ लेखापाल
एकूण पदसंख्या45
परीक्षा शुल्क : अराखीव (खुला) प्रवर्ग- १००० /-
राखीव प्रवर्ग ९००/-
माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ आहे.
वेतन २९२००-९२३००
अर्ज प्रक्रियाOnline

NMK 2025 | NMK Job 2025

Lekha koshagar Amravati Bharti 2025: पात्रता व अटी

  • शैक्षणिक पात्रता:
    • कोणत्याही शाखेतील पदवी
    • मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनीट किंवा
    • इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
    • संगणक कौशल्य आवश्यक.
  • वयोमर्यादा:
    • 19 ते 38 वर्षे (SC/ST प्रवर्गासाठी वयात सवलत).
  • निवड प्रक्रिया:
    • CBT परीक्षा

Lekha koshagar Amravati Bharti 2025: महत्त्वाच्या तारखा

घटनातारीख
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवातदि. 29 जानेवारी 2025 रोजी १७.०० वाजल्यापासून
ऑनलाईन पद्धतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी २३.५९ वाजेपर्यंत
लेखी परीक्षेची तारीखयाबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

महत्त्वाच्या लिंक्स

🖨️ जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
📝ऑनलाईन परीक्षेचा दिनांक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल
🔗 ऑनलाईन अर्ज लिंक:29 जानेवारी  2025 पासून
🌍 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

FAQ: अमरावती लेखा कोषागार भरती 2025

1. अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

2. अर्ज शुल्क किती आहे?

अराखीव (खुला) प्रवर्ग- १००० /-
राखीव प्रवर्ग ९००/-
माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ आहे.

3. लेखी परीक्षा कधी होणार आहे?

15 फेब्रुवारी 2025 रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येईल.

4. कोणते कागदपत्र जोडणे आवश्यक आहे?

शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), इ.


Leave a Comment